MKSS LOGO
9922419278, 9175494930 parvatibaiav@gmail.com

For Admission / Course Details, please click here

Announcements read more
News / Usefull Links read more
About the institute, Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS)
Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune: – the 129 years-old parent body has been committed to “Empowerment of Women through Education”. The Institution works relentlessly towards educating the women and thereby making them self-reliant. The Samstha was established in 1896 by the great visionary and social worker Bharat Ratna Maharshi Dhondo Keshav Karve to provide shelter to destitute women. read more
About Parvatibai Adhyapika Vidyalaya
Welcome to Parvatibai Adhyapika Vidyalaya, Karvenagar, Pune 52. Parvatibai Adhyapika Vidyalaya is a dynamic institution with unrivalled reputation in pre -service training of elementary teachers, established with the inspiration of Parvatibai Athawale is sister in law of great Maharshi Anna Karve’ Bharatratna , award’ winner, The institution was established on 20 June 1917 and has been imparting quality teachers’ education over last 108 years.

Estd. Year : 20 July 1917
NCTE NO :112188
College Code : 2107

वारसा शिक्षणाचा, महर्षींच्या विचारांचा

संवेदनशील शिक्षका घडविण्याची उज्ज्वल परंपरा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्वतीबाई अध्यापक विद्यालय कर्वेनगर, पुणे५२

१०९ वर्षांचा समृद्ध वारसा महिला शिक्षणासाठी अखंड योगदान


. महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या, पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयात प्रवेश का घ्यायचा ?

महिला शिक्षणाचा प्रेरणादायी वारसा

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांचे शिक्षण, सक्षमीकरण आणि स्वाभिमान यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या महान विचारांमधून १९१७ मध्ये सुरू झालेल्या या अध्यापक विद्यालयाने  विद्यार्थिनींना शिक्षणासोबत आत्मविश्वास, संस्कार आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव दिली आहे. गेल्या १०९ वर्षांपासून संस्था महिला शिक्षणाचा अखंड वारसा जपत आदर्श संवेदनशील शिक्षिका घडवत आहे.

 

. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास :-

या महाविद्यालयात विद्यार्थिनींना केवळ पुस्तकातील ज्ञान दिले जात नाही, तर अध्यापन कौशल्य, सूक्ष्म-अध्यापन (Micro Teaching), नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती यांचे प्रशिक्षण दिले जाते. आधुनिक शिक्षणशास्त्राच्या माध्यमातून सक्षम, संवेदनशील आणि आत्मविश्वासपूर्ण शिक्षिका म्हणून घडवले जाते.

 

. समृद्ध परंपरेचा अभिमान

या अध्यापिका विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थिनी आज देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आदर्श आम्हाला प्रेरणा देतो आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याची ऊर्जा प्रदान करतो.

 

. आधुनिक शिक्षण तंत्रज्ञान

डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी अध्यापिका विद्यालयात आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल क्लासरूम, -लर्निंग आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे आम्हाला नव्या शैक्षणिक संधींची ओळख होते आणि अध्यापन अधिक प्रभावीपणे करण्याचे कौशल्य विकसित होते.

 

. महिला सक्षमीकरणाची प्रेरणा

महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या ध्येयातून प्रेरित होऊन हे अध्यापिका विद्यालय विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करते. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवनमान उंचावून त्यांना सक्षम नागरिक बनविण्याचे महान कार्य सातत्याने करत आहे.

 

. उज्ज्वल भविष्याची दिशा

अध्यापक विद्यालयातील शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. विविध स्पर्धा परीक्षा, शालेय शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी येथे विशेष मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था अध्यापक विद्यालय सदैव कटिबद्ध आहे.

 

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यापक विद्यालय

केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर सक्षम, संस्कारित आणि आदर्श शिक्षिका घडविणारी प्रेरणादायी परंपरा आहे.

शब्दांकन : प्रा. धर्मेंद्र मोरे

News ght:bold"> News








Announcements








Events








Parvatibai Adhyapika Vidyalaya
Welcome to Parvatibai Adhyapika Vidyalaya, Karvenagar, Pune 52. Parvatibai Adhyapika Vidyalaya is a dynamic institution with unrivalled reputation in pre -service training of elementary teachers, established with the inspiration of Parvatibai Athawale is sister in law of great Maharshi Anna Karve’ Bharatratna , award’ winner, The institution was established on 20 June 1917 and has been imparting quality teachers’ education over last 108 years.

Estd. Year : 20 June 1917
NCTE NO :112188
College Code : 2107
Contact Us
Address: - Parvatibai Junior College of Education MKSSS Campus Karvenagar, Pune 52.
Contact No: - 9922419278, 9175494930
Email ID: - parvatibaiav@gmail.com
© Parvatibai Adhyapika Vidyalaya, Pune. All rights reserved.